कापूस लागवड पद्धती ,Cotton cultivation methods

कापूस लागवड पद्धती ,Cotton cultivation methods

महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा नगदी पीक कापूस याची लागवड करीत असतो. कापसाचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी मशागत , वाण , हवामान, खत व्यवस्थापन , कीड व रोग नियंत्रण , या गोष्टीची आवश्यकता असते,तसेच कापसाची लागवड पध्दतः हाही एक महत्वाचा घटक आहे. वेग-वेगळ्या राज्यात ,वेग-वेगळ्या विभागात कापूस लागवडीच्या वेग-वेगळ्या पध्द्ती आहेत. 
           भारतात तसेच महाराष्ट्रात कापूस लागवडीच्या पारंपरिक पद्धती वापर करत असत परंतु आता शेतकरी व शास्त्रज्ञ यांनी वेळोवेळी संशोधन करून कापूस लागवड पद्धतीत आमूलाग्र बदल करून भरघोस उत्पन्नात वाढ केलेली आहे. पारंपरिक  कापूस लागवड पद्धतीने कापसाच्या उत्पन्नात घट होत असल्याने नवीन कापूस  लागवड पद्धतीने दोन ओळीतील * दोन झाडातील अंतर यात बदल करून उत्पादन वाढवून खर्चात बचत केली आहे. चला तर जाणून घेऊ कोणकोणत्या कापूस लागवडीच्या पद्धती आगेत. त्यात चांगले उत्पन्न देणारी व कमी खर्च होणारी पद्धत कोणती .....  

कापूस लागवडीच्या पद्धती :-

                                                १] समान अंतर पद्धत :-
                                                २] विषम अंतर पद्धत :-
                                                ३] जोड ओळ पद्धत :-
                                                ४] सरी वरंबा पद्धत :-
                                                ५] पट्टा पद्धत :-


१] समान अंतर पद्धत :-
                                     " सामान म्हणजे सारखे अंतर " , दोन ओळीतील *दोन झाडातील अंतर हे सारखेच जसे :-  २ फूट * २ फूट , ३ फूट * ३ फूट , ४ फूट * ४ फूट , ... पूर्वी पारंपरिक पद्धतीने कंपनी लागवड केली जात असत .त्याने ह्या पद्धतीने असा कि , दोन झाडातील अंतर हसत असल्याने आंतरमशागत करायला सोपे जाते, त्याने निंदण्याचा खर्च वाचतो. परंतु या पद्धतीने कापूस लागवड केल्याने झाडाची संख्या कमी होते त्याने उत्पन्नात घट होते. तसेच झाड जवळजवळ असंल्याने त्याच्यामध्ये आंतरमशागत करणे कठीण होते. कीटकनाशके मारताना . कापसाची वेचणी करतांना झाडाच्या फांदीची मोडतान होते. कापसाची उत्पन्नात नुकसान होते. या पद्धतीने  एकरी झाडाची संख्या कमी राहते त्याने झाडाची संख्या वाढवता येत नाही त्याने उत्पादन कमी राहते. 

 २] विषम अंतर पद्धत :-
                                     " विषम म्हणजे सामान नसलेले अंतर " दोन ओळीतील अंतर * दोन झाडातील अंतर हे विषम असते. जसे.:- ४ फूट * १ फूट , ४ फूट * १.५ फूट ,  ४ फूट * २ फूट , ५ फूट * १ , ५ फूट * १. ५ फूट , ६ फूट * १ फूट ..... यामध्ये दोन ओळीतील अंतर जास्त आणि दोन झाडांमधील अंतर कमी अशाप्रकारची कापूस लागवड पद्धत आहे. याने दोन ओळीतील मोकळी जागा राहते. त्याने फवारणीसाठी, आंतरमशागतीसाठी , कापूस वेचणीसाठी ,आंतरपीक घेण्यासाठी उपयुक्त अशी पद्धत आहे. याने दोन ओळींमध्ये हवा खेळती राहते. सूर्यप्रकाश मिळतो. त्याने झाडाची वाढ होऊन झाडाला जास्त बोन्डे लागतात. या पद्धतीने कापूस लागवड केल्यास झाडाची संख्या जास्त होते. झाडाची संख्या वाढल्याने उत्पन्नात वाढ होते. दोन ओळींमध्ये दाटी होणार नाही याची काळजी घेऊन अंतर ठेवावे.

 ३] जोड ओळ पद्धत :-
                                "जोड म्हणजे जोडीने ओळ " दोन ओळी जवळ आणि तिसरी ओळीचे अंतर दूर अश्या पद्धतीची कापूस लागवड आहे. जसे:-  ५*२*२ फूट किंवा ५*२*३ फूट .... या पद्धतीने कापूस लागवड केल्यास झाडाची संख्या वाढते. परंतु दोन झाडांमधील अंतर खूप जवळ होते. त्याने दाटी होऊन फुल ,पाते गळ होते. त्याने उत्पन्नात घाट होते. या पद्धतीने कापूस लागवड केल्यास आंतरमशागतीसाठी ,फवारणीसाठी , वेचणीसाठी , अन्य कामासाठी अडचण निर्माण होते. या पद्धतीचा कापूस उत्पादन वाढीस फारसा फायदा होत नाही.

 ४] सरी वरंबा पद्धत :-
                                   "सरी वरंबा म्हणजे जमिनीच्या समांतर पातडीपासून एका सरळ रेषेत वर १ ते १. ५ फुटापर्यंत उचलेली  माती  " या पद्धतीत १ ते १. ५ फूट उंच वरंबा करून त्यावर कापूस लागवड केलेली असते. हे सुद्धा विषम अंतर पद्धतिचा वापर यामध्ये केलेला असतो. ज्याठिकाणी पावसाचे पाणी जास्त पडते अश्या ठिकाणी जमीनतीत पाणी साचते . त्याने झाडाची मर रोग ,( इंग्लिशमध्ये  root rot) अश्या रोगापासून वाचून झाड टिकून राहते. परंतु जर जोराने चक्रीवादळ आल्यास झाडे उपटण्याची शक्यता असते. 

५] पट्टा पद्धत :- 
                        "पट्टा म्हणजे दोन ओळीतील विषम अंतर "  या पद्धतीत दोन ओळीतील अंतर ५ फूट *१ फूट  तर दुसरी व तिसरी ओळीतील अंतर हे ७ फूट * १ फूट असे असते. या पद्धतीने एका एकरात बसणारी झाडाची संख्या = ४ फूट * २ फूट या अंतराने होणाऱ्या झाडाची संख्या हि एकच असते .  याने दोन ओळीतील मोकळी जागा राहते. त्याने फवारणीसाठी, आंतरमशागतीसाठी , कापूस वेचणीसाठी ,आंतरपीक घेण्यासाठी उपयुक्त अशी पद्धत आहे. याने दोन ओळींमध्ये हवा खेळती राहते. सूर्यप्रकाश मिळतो. त्याने झाडाची वाढ होऊन झाडाला जास्त बोन्डे लागतात. या पद्धतीने कापूस लागवड केल्यास झाडाची संख्या जास्त होते. हि पद्धत अमृत पॅटर्न म्हणून ओळखली जाते.  

या पद्धतीमध्ये विषम अंतर पद्धत , पट्टा पद्धत , या पद्धती माझ्या शेतकरी राज्यासाठी उपयुक्त आहेत. या पद्धतीचे फायदे खालीलप्रमाणे :- अ] हवा मोकळी राहते. 
                                    ब] योग्यरित्या आंतरमशागत करता येते. 
                                   क] आंतरपीक घेता येते 
                                    ड] कीटकनाशक फवारणीसाठी योग्य 
                                    इ] खत देण्यास योग्य 
                                   फ] वेचणीसाठी योग्य 
                                   ग] भरपूरप्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो 
                                   ह] खर्चात बचत होते. 
                                  य] झाडसंख्या वाढते. 
                                  ज] उत्पन्नात २५ ते ३० % वाढ होते.
                                  क] दोन ओळीतील अंतर जास्त असल्याने पाते-फुल गळ होत नाही. 
या पद्धतीचा वापर करत असतांना आपली हलकी ,मध्यम, भारी जमीन कश्यापद्धतीची आहे . यावरून आपण कोणत्या पद्धतीने कापूस लागवड करावी हे ठरवावे. तसेच आपल्या जमिनीला पाणी देण्याची सुविधा असल्यास आंतर जास्त ठेवावे. जमिनीची पोत , पाण्याची व्यवस्था , हवामान , या सर्व गोष्टीचा विचार कारण आपल्या शेतात कापूस लागवडीचे आपण स्वतः ठरवावे. 

सूचना:- सदरचा लेख हा शेतकऱ्यांचे अनुभव ,  सरकारी कृषी वेबसाइटवरील तज्ज्ञ लोकांनी मांडलेली मते , तसेच माझ्या अनुभवातून लिहण्यात आलेला आहे. यापासून होणाऱ्या नुकसान व फायद्यास माझा शेतकरी राजा हि वेबसाईटची कोणतीही जवाबदारी राहणार नाही. 


Post a Comment

0 Comments